Home / Principal’s Message

 

श्री. सुदाम सहादू कापडणीस (एम.ए., बी.एड., डी.एस.एस.),मुख्याध्यापक- माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग, ज्ञान विकास संस्था

 

“ज्ञान द्यावे, ज्ञान घ्यावे, शहाणे करून सोडावे सकल जना”

* बहुजन समाजासाठी शिक्षण’ हा हेतू डोळयासमोर ठेवून ज्ञानविकास संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्री. पी. सी. पाटील साहेब व सचिव श्री मोरेश्वर पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून व तत्कालीन शिक्षणप्रेमी संचालकांच्या सहकार्यातून ६ नोंव्हेंबर १९८७ साली ज्ञानविकास संस्थेची स्थापना करण्यात आली. या वर्षी संस्थेने यशस्वितेची ३० वर्षे पूर्ण केली. या ३० वर्षात संस्थेमध्ये विविध शैक्षणिक विभाग यशस्वी पुणे कार्यरत आहेत परंतु ६ नोव्हेंबर १९८७ साली संस्थेने लावलेले पहिले रोपटे म्हणजेच ज्ञानविकास माध्यमिक दिद्यालय व त्यानंतर उदयास आलेले उच्च माध्यमिक (इ.८वी ते १०वी) व उच्च माध्यमिक (इ.११वी ते १२वी वाणिज्य/विज्ञान) या दोन्ही विभागाच्या एकूण २३ तुकडया असून त्यामध्ये जवळजवळ १३६० विद्यार्थी या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत आहेत. या दोन्ही विभागात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकूण ६० कर्मचारी विद्यादानाचे काम आनंदाने करीत आहेत. संस्थेचे मार्गदर्शन, शिक्षकांची मेहनत, पालकांचा विश्वास, पालकसभा, १०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांचे जादा तास त्यामुळे आजपर्यंत नेहमीच इ.१०वी व १२ वीचा निकाल ९९ % पर्यंत लागत आलेला आहे. ही बाब संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची आहे.”